My new blogs
एकदा राजा कृष्णदेव यांच्या
आमंत्रणानुसार भक्त पुरंदरदास राजवाड्यात
गेले होते. परत जातांना राजाने दोन मुठी
भरून तांदूळ त्यांच्या झोळीत टाकत म्हटले,
महाराज, या लहानशा भेटीचा स्वीकार
करून माझ्यावर कृपा करावी. राजाने त्या
तांदळात थोडे हिरे मिसळले होते.
पुरंदरदासांच्या पत्नीने घरी तांदूळ
निवडतांना त्यांत काही मौल्यवान रत्ने
असल्याचे पाहिले. तिने ती तांदळातून
निवडून काढून कचरापेटीत फेकून दिली.
Comments
Post a Comment